बातम्या
आजरा साखर कारखान्या जवळील वन विभागाच्या जंगलासोबत काजुची बाग आगीच्या भक्षस्थानी
By nisha patil - 11/4/2026 11:57:38 PM
Share This News:
*आजरा साखर कारखान्या जवळील वन विभागाच्या जंगलासोबत काजुची बाग आगीच्या भक्षस्थानी*
**आजरा(हसन तकीलदार )**:-गवसे तालुका आजरा येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या वन विभागाच्या जंगलाबरोबरच जवळपास अंदाजे 25 ते 30 एकर काजू बागेला आग लागुन लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल दि. 10 एप्रिल रोजी रात्रीच्या 9:00 ते 9:30 च्या सुमारास भोगूलकर यांचे शेतातील गवतास आग लागली होती. ती आग रात्रीच विझवण्यात आल्याचे भरत भोगूलकर यांनी सांगितले परंतु आज दि. 11एप्रिल रोजी सकाळी 11 :00च्या सुमारास पुन्हा लागली. त्यामुळे भोगूलकर यांच्या शेतातील उभे गवत पेटून या आगीने रौद्रावतार धारण करीत संपूर्ण काजूच्या बागेला भक्ष केले.यामध्ये भरत भोगूलकर, गिरीश भोगूलकर, नितीन भोगूलकर, बाळू भोगूलकर, चंद्रकांत भोगूलकर, गुणानाथ भोगूलकर, मारुती भोगूलकर, रघुनाथ भोगूलकर तसेच मुकुंद पाटकर, संजय ज्योती यांची काजूची झाडे संपूर्णपणे होरपळून गेल्याने आणि आलेला मोहोर जळल्याने यावर्षी या झाडांना काजू लागणार नाहीत त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे भरत गुंडू भोगूलकर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले
तर बाजूलाच कारखाना कर्मचारी कॉलनी व कारखान्याचा प्रेसमड डेपो असल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ अग्निशामक दलाची गाडी मागविण्यात आली. अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत कारखान्याकडील कर्मचाऱ्यांनी उपलब्ध साधनांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते. दीड-दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. घटनास्थळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजीराव सावंत, कार्यालयीन अधीक्षक अनिल देसाई, एच आर मॅनेजर सुभाष भादवणकर, सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई, सॅनिटरी ऑफिसर रघुनाथ देसाई, सिव्हिल इंजिनिअर शंकर आजगेकर यांच्यासह कारखान्याकडील 30 ,40 कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. तोपर्यंत आजऱ्याहून अग्निशमन दल आल्याने सर्वांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला जर प्रेसमड डेपो पर्यंत आग गेली असती तर नुकसान झाले असते असे कारखान्याचे सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई यांनी माहिती दिली.एकंदरीत सद्या वणव्यांचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची साखळी भक्षस्थानी पडून निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. यासाठी यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना आखणे गरजेचे आहे असे निसर्ग प्रेमिंचे मत आहे.
आजरा साखर कारखान्या जवळील वन विभागाच्या जंगलासोबत काजुची बाग आगीच्या भक्षस्थानी
|