बातम्या
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी मोहिमे अंतर्गत पालकमंत्री शेतात
By nisha patil - 7/13/2026 3:58:47 PM
Share This News:
**माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी मोहिमे अंतर्गत पालकमंत्री शेतात*
*जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर*
**आजरा(हसन तकीलदार)*:-कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून "एक दिवस बळीराजासाठी"अशा पद्धतीचा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात 13 जुलै 2026 रोजी राबविण्यात आला. सरपंचापासून आमदार, खासदार ते मंत्री. जिल्हाधिकाऱ्यापासून ग्रामसेवक ते तलाठी सगळेच आज शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर आहेत. याच उपक्रमातून जिल्ह्याचे लाडके पालक मंत्री तथा आरोग्यमंत्री नाम. प्रकाश आबिटकर हे आजरा तालुक्यातील मसोली या गावात शेतकऱ्याच्या शेतात पॉवर ट्रिलर चालवून घनसाळ भात रोपणीत सहभाग घेतला.
या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. मागेल त्या शेतकरी, बागायतदाराला काजू योजनेअंतर्गत 2 लाख काजू कलमांचे वाटप व लागवड, पाणी फाउंडेशन व राष्ट्रीय निबीड शेती संकल्पनेबाबत मार्गदर्शन, एल निनो परिस्थितीमुळे शेतीवर होणाऱ्या परिणामाबाबत उपाययोजनांची माहिती, कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेत्यांशी थेट संवाद, महाबीटी पोर्टल द्वारे कृषी अवजारे व विविध अनुदान योजनांची माहिती, ए. आय. तंत्रज्ञान वापरून शेती करण्याबाबत मार्गदर्शन, खतांचे ऑनलाईन बुकिंग व क्यू आर कोडद्वारे खत विक्रीची माहिती. विविध विभागाच्या माध्यमातून 5 लाख वृक्षलागवडीचा संकल्प अशा उपक्रमांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना नाम. आबिटकर म्हणाले की, आजऱ्याला घनसाळचे माहेरघर मानले जाते. याच आजरा तालुक्यातील मसोली गावात घनसाळ भात जास्त प्रमाणात पिकवला जातो. याच घनसाळ भाताच्या रोप लागणित भाग घेण्याचा योग आला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी कष्ट करतो आणि शेतकरी हाच खरा अन्नदाता आहे. बळीराजासाठी आपण वेळ काढला पाहिजे आणि बळीराजाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. हा उद्देश घेऊनच येथे आलो आहे. अधिकाऱ्यासोबतच शाळेची मुलंही आमच्या बरोबर सहभाग नोंदवला आहे. नवीन पिढीमध्ये सुद्धा शेतीविषयी आकर्षण निर्माण केले पाहिजे. शेतीविषयी असणारे आकर्षण नवीन पिढीत होतंय की काय असे चित्र दिसतंय परंतु आजच्या दिवशी जिल्ह्यातील विद्यार्थी शेतीत आहेत. केवळ एक दिवस बळीराजासाठी न देता सातत्याने बळीराजासाठी दिले पाहिजे. शेतीच्या विकासासाठी दिला पाहिजे.
यावेळी जालिंदर पांगिरे(जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर ), हरीश सूळ(उपविभागीय अधिकारी, आजरा - भुदरगड), किरण पाटील(उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंग्लज), राजेंद्र माने (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर), समीर माने (तहसीलदार आजरा), सुभाष सावंत(गटविकास अधिकारी), भूषण पाटील(तालुका कृषी अधिकारी, आजरा), याबरोबरच राजेंद्र सावंत (उपजिल्हाप्रमुख)विजय थोरवत, संजय पाटील, संतोष भाटले,सुरेश होडगे,रणजीत सरदेसाई, शरीफभाई खेडेकर, नाथा देसाई, अभिजित रांगणेकर, मेहताब आगा, महेश दळवी, अमानुला आगलावे, अबुलास दरवाजकर आदिजण उपस्थित होते.
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी मोहिमे अंतर्गत पालकमंत्री शेतात
|