ताज्या बातम्या

दोडामार्ग दौऱ्यात काँग्रेसची संघटनात्मक बैठक; SIR प्रक्रियेवर मार्गदर्शन, पोलीस निरीक्षक खोपडे यांचा सत्कार

dodamarg congress organizational meeting sir guidance pi khopade felicitation


By Shivani - 10/7/2026 5:59:41 PM
Share This News:



दोडामार्ग दौऱ्यात काँग्रेसची संघटनात्मक बैठक; SIR प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, पोलीस निरीक्षक खोपडे यांचा सत्कार

दोडामार्ग | शुभम गवस : 

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पक्ष संघटना मजबूत करणे, आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीत अरविंद मोंडकर यांनी पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावांत सक्रिय राहण्याचे आवाहन केले. तसेच मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या SIR प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून आवश्यक माहिती पोहोचविण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी संघटनात्मक बळकटी, बूथस्तरावरील कार्य अधिक प्रभावी करणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी मजबूत करण्यावरही भर देण्यात आला.

दौऱ्यादरम्यान साटेली-भेडशी परिसरातील चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावल्याबद्दल दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोपडे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. चोरीच्या प्रकरणाचा वेगाने तपास पूर्ण करून आरोपींना अटक केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाला सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे, तालुकाध्यक्ष बाबू गवस, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, संतोषकुमार दळवी, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक, सुभाष दळवी, सुधीर चांदेलकर, सुधीर गवस, श्रीकृष्ण गवस, संदीप नाईक, सोनू गवस, मोहन गवस, बाबाजी सावंत, सुशांत बोंद्रे, दिनानाथ उगवेकर, मदन सावंत, तुकाराम नाईक, विजय हेरेकर, देवानंद हजारे, राजन गावडे, विठ्ठल नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या दौऱ्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


ongress Strengthens Organization in Dodamarg;
Total Views: 42