बातम्या
आजऱ्यात पावसाची दमदार सुरुवात; खरीप पिकांना दिलासा
By nisha patil - 7/17/2026 4:06:36 PM
Share This News:
आजऱ्यात पावसाची दमदार सुरुवात; खरीप पिकांना दिलासा
आजरा प्रतिनिधी हसन तकिलदार आजरा तालुक्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोप लागण, नाचणी, भुईमूग, सोयाबीन तसेच इतर खरीप पिकांसाठी पावसाची नितांत आवश्यकता होती.
विशेषतः भात रोप लागणीसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे रोप लागणीच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून पावसामुळे पिकांना चांगला फायदा होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.
आजऱ्यात पावसाची दमदार सुरुवात; खरीप पिकांना दिलासा
|