बातम्या

वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान व संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करा. मनसेचे वनविभागाला निवेदन

Ajra van vibhag


By nisha patil - 3/30/2026 11:08:50 PM
Share This News:



**वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान व संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करा. मनसेचे वनविभागाला निवेदन*

**आजरा (हसन तकीलदार)*:-महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा आजरा तर्फे वन क्षेत्रपाल, वन विभाग, आजरा यांना वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासाबद्दल निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की,आजरा तालुक्यात वन्यप्राण्यांचा दिवसेंदिवस त्रास वाढत असून शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

नुकत्याच सिरसंगी येथे हत्तीने दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान केले आहे. मात्र अशा प्रकारच्या खासगी मालमत्तेच्या नुकसानीस वन विभागाकडून भरपाई देता येत नसल्याचे सांगितले जात आहे. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. वन्यप्राणी खासगी मालमत्तेत येऊन नुकसान करत असताना भरपाई न देणे योग्य नाही. याबाबत स्पष्ट धोरण ठरवून शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय मिळणे गरजेचे आहे.तसेच हत्ती, गवेरेडे, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई देणे, प्रक्रिया सुलभ करणे व विलंब टाळणे गरजेचे आहे. जंगलालगतच्या शेतकऱ्यांना सौर कुंपण देणे, जखमी किंवा मृत्यू झाल्यास भरपाई वाढवणे या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात.

 

यासोबतच रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत असलेली धोकादायक झाडे त्वरीत हटवून संभाव्य अपघात टाळावेत.

 

वरील सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आपल्या कार्यालसमोर रास्ता रोको करण्यात येईल त्या दरम्यान जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस त्यास आपण सर्वस्वी जबाबदार असाल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर तालुकाध्यक्ष आनंदा घंटे,

सुशांत पोवार,,यश सुतार,विलास शिवणगेकर आदींच्या सह्या आहेत.


वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान व संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करा. मनसेचे वनविभागाला निवेदन
Total Views: 77