बातम्या

आजऱ्यात युवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन*

Ajra yovashivsena


By nisha patil - 7/25/2026 2:59:39 PM
Share This News:



**आजऱ्यात युवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन*

**आजरा(हसन तकीलदार)*:-संविधानिक पद्धतीने दिल्लीच्या जंतर मंतर वर आपल्या हक्काचा लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आम. सदाभाऊ खोत यांनी आतंकवादी म्हणून संबोधित करून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला बदनाम केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत त्यांच्या प्रतिमेला छत्रपती संभाजी चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

        संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडत आपल्या अधिकारासाठी आणि भविष्यासाठी विद्यार्थी लढा देत आहेत. नीटच्या पेपर फुटी विरोधात सर्व युवा शक्ती एकवटली असताना सरकारच्या इशाऱ्यावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला आणि त्यातच आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना देशद्रोही असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज चौक,आजरा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे आजरा युवासेनेच्या वातीने तीव्र निदर्शने करण्यात आली आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.सदाभाऊ खोत यांच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दाणाणून गेला.

     यावेळी (युवासेना जिल्हाप्रमुख) अवधूत पाटील,(युवासेना उपजिल्हाप्रमुख) महेश पाटील,( शिवसेना शहरप्रमुख) समीरभाई चांद, सागर नाईक, रोहन गिरी, संजय येसादे, सुयश पाटील, अमित गुरव,दिनेश कांबळे,बिलाल लतीफ, हरिश्चंद्र व्हराकटे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आजऱ्यात युवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन*
Total Views: 202