बातम्या

पेरणोली ता. आजरा येथे"एक दिवस माझ्या बळीराजासाठी"उपक्रम संपन्न*

Ajra0


By nisha patil - 7/14/2026 6:22:51 PM
Share This News:



**पेरणोली ता. आजरा येथे"एक दिवस माझ्या बळीराजासाठी"उपक्रम संपन्न*

**आजरा(हसन तकीलदार)*:-पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे संकल्पनेतील "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत पेरणोली येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

         सुरवातीस ग्रामपंचायत पेरणोली येथे सरपंच सौ. वनश्री देसाई, उपसरपंच संकेत सावंत यांच्या हस्ते तानाजी पाटील यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. 

       आजरा घनसाळ उत्पादक शेतकरी मारुती परीट या शेतकऱ्याच्या शेतात पॉवर टिलर स्वतः चालवून चिखलणी केली. यानंतर चिखलात उतरुन त्यांनी भातरोप रोपणही केले. रोप लावणीनंतर शेतकऱ्यांसोबत बांधावर बसून झुणका भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना ताग व भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी जिल्हा परिषद सदैव शेतकऱ्यांच्या सोबत असुन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच आजरा घनसाळची शुद्ध बियाणे निर्मिती, उत्पादन वाढ व मार्केटिंग साठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

   या उपक्रमांतर्गत त्यांनी गावामध्ये वृक्षारोपण केले तसेच पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक शाळा,सेवा संस्था, दुध संस्था इ. संस्थांनाही भेटी देऊन मार्गदर्शन केले.

  यावेळी बांबू लागवडीची माहिती पाटलोबा पाटील यांनी दिली.

     या सर्व उपक्रमांवेळी त्यांचे सोबत सरपंच सौ. वनश्री देसाई, उपसरपंच संकेत सावंत, सर्व ग्रा. पं. सदस्य, राजेंद्र सावंत, तानाजी देसाई, काका देसाई,अमृत देसाई, सुरेश कालेकर, सर्जेराव देसाई, अमर पवार, रवींद्र देसाई, शिवाजी देसाई, सासूलकर, संदीप नवलकर , नामदेव मोहिते, धीरज सावंत, दत्तात्रय पाटील, जी.एम.पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे, कृषि विकास अधिकारी राजेंद्र माने, गट विकास अधिकारी सुभाष सावंत सहायक गटविकास अधिकारी सुरेश पुजारी, कृषि अधिकारी दिनेश शेटे, तालुका कृषी अधिकारी भुषण पाटील,विस्तार अधिकारी पृथ्वीराज

 चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी कु. अमिषा देवर्डेकर, सहाय्यक कृषि अधिकारी सौ.मनिषा पाटील मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, शिक्षक,विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.


पेरणोली ता. आजरा येथे"एक दिवस माझ्या बळीराजासाठी"उपक्रम संपन्न*
Total Views: 223