बातम्या
आजऱ्यात मागील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने ऊस पीक पडून शेतकऱ्यांचे नुकसान*
By nisha patil - 7/14/2026 6:25:38 PM
Share This News:
*आजऱ्यात मागील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने ऊस पीक पडून शेतकऱ्यांचे नुकसान*
**आजरा(हसन तकीलदार)*:-यावर्षी वळीव पाऊस पडल्याने तसेच जुनच्या महिन्यात पाऊस कमी पडल्याने तालुक्यातील ऊसपीक अगदी जोमाने वाढले आहे. साधारणपणे 8 ते 10 कांड्यावर आलेले ऊस यावर्षी चांगले उत्पन्न देणार अशी अशा होती. परंतु जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अतिवृष्टी व जोराचा वारा सुटल्याने ऊस पीक पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
गवसे ता. आजरा येथील प्रगतशील शेतकरी अशोक गुरव हे अतिशय चांगल्या व आधुनिक पद्धतीने शेती करीत ऊस पीक घेतात.ऊस पीक स्पर्धेमध्ये त्यांनी बक्षीसेही घेतली आहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, यावर्षी ऊस पिकाला योग्य प्रकारचे हवामान व पाऊस असल्याने यंदा ऊस पीक जोमात आले होते. परंतु जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ऊस पीक विसकटून पडल्यामुळे ऊस बांधणी करणे अवघड झाले आहे. एका बाजूला ऊस पडला असता तर कदाचित बांधणी करता आली असती परंतु इकडे तिकडे विसकटून पडल्यामुळे ऊस बांधणी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे ज्यांचा ऊस पडला आहे त्यांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली तर सावरवाडी ता. आजरा येथील शेतकरी नियाज तकीलदार यांनी आपल्या ऊसाची अवस्था बिकट झाली असल्याचे सांगितले. साधारण एक एकरची पट्टी विसकटून पडल्याने नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कृषी विभागाने पडलेल्या ऊसांचे पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून होताना दिसत आहे.
आजऱ्यात मागील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने ऊस पीक पडून शेतकऱ्यांचे नुकसान*
|