बातम्या

आंबा-काजू उत्पादकांचा १५ मे रोजी ‘वर्षा’वर मोर्चा; सरकारविरोधात राजू शेट्टी आक्रमक

Amba kaju


By nisha patil - 5/13/2026 7:41:52 PM
Share This News:



आंबा-काजू उत्पादकांचा १५ मे रोजी ‘वर्षा’वर मोर्चा; सरकारविरोधात राजू शेट्टी आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) : आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी १५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी सरकारवर विश्वास नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना विमा व नुकसानभरपाई मिळण्यात होत असलेल्या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पंचनाम्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसून प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.

यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी कोकणातील शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगत सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. आमदार भाई जगताप यांनी अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले.

बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


आंबा-काजू उत्पादकांचा १५ मे रोजी ‘वर्षा’वर मोर्चा; सरकारविरोधात राजू शेट्टी आक्रमक
Total Views: 5