बातम्या

अठरा वर्षांचा गुरु-शिष्य ऋणानुबंध... सेवेतून साकारलेली गुरुदक्षिणा

An eighteen year bond between Guru and disciple


By nisha patil - 7/29/2026 1:47:19 PM
Share This News:



अठरा वर्षांचा गुरु-शिष्य ऋणानुबंध... सेवेतून साकारलेली गुरुदक्षिणा

गुरु हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर विचारांची दिशा देणारा आणि जीवनाला मूल्यांची शिदोरी देणारा असतो. अशाच एका निःस्वार्थ गुरु-शिष्य नात्याचा सुंदर प्रवास कोल्हापूर जिल्ह्यातील युवा नेतृत्व युवराज येडूरे यांच्या कार्यातून गेली तब्बल अठरा वर्षे सातत्याने अनुभवायला मिळत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्ते, महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले युवराज येडूरे हे दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दर्शन घेऊन त्यांना गुरुवंदन करतात आणि आशीर्वाद प्राप्त करतात. हा केवळ औपचारिक भेटीचा सोहळा नसून विचार, संस्कार आणि प्रेरणेचा अखंड ऋणानुबंध आहे.

राज ठाकरे यांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजकारण आणि जनसेवेचा मार्ग स्वीकारलेल्या युवराज येडूरे यांनी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून राज्यभरातील अनेक सेवाभावी संस्थांना बळ दिले आहे. सीएसआर निधी उपलब्ध करून देणे, संस्थांना सक्षम करणे, गरजू शेतकरी, वंचित आणि दुर्बल घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे या कार्यामुळे अनेक संस्था नव्या उमेदीने कार्यरत झाल्या आहेत. या उपक्रमांमुळे सामाजिक विकासाबरोबरच स्थानिक अर्थकारणालाही चालना मिळाली आहे.

गुरूंच्या विचारांना कृतीची जोड देत समाजहिताची वाट चालणारा हा अठरा वर्षांचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे. गुरुंना वाहिलेली हीच खरी गुरुदक्षिणा असल्याची भावना त्यांच्या कार्यातून सातत्याने प्रकट होताना दिसते.


अठरा वर्षांचा गुरु-शिष्य ऋणानुबंध... सेवेतून साकारलेली गुरुदक्षिणा
Total Views: 13