बातम्या

व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये  अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी     

Annabhau Sathe Jayanti and Lokmanya Tilak


By nisha patil - 1/8/2026 7:28:38 PM
Share This News:



व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये  अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी     
आजरा(हसन तकीलदार):- येथील व्यंकटराव प्रशालेमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.   प्राचार्य एस.एन. पाटील व पर्यवेक्षिका व्ही.जे. शेलार यांनी प्रतिमेचे पूजन केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्र निर्मितीतील योगदान, मराठी साहित्य क्षेत्रातले योगदान याबद्दल माहिती सांगितली.

राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील लोकमान्य टिळकांचे योगदान, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही क्रांतीची प्रेरणा जागृत करणारे लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती देण्यात आली. आर्या कांबळे व हाजिक सय्यद यांनी भाषणे सादर केली. आस्था गुरव व सृष्टी कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आभार साक्षी कुंभार हिने मानले. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावी (अ )चे विद्यार्थी व वर्गशिक्षिका ए डी पाटील  यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये  अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी     
Total Views: 10