बातम्या
आरदाळ ता. आजरा तेथे नाचणी पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
By nisha patil - 6/8/2026 11:56:12 PM
Share This News:
**आरदाळ ता. आजरा तेथे नाचणी पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आज दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम नाचणी पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम मौजे आरदाळ तालुका आजरा येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रूपाली पाटील (सरपंच आरदाळ) उपस्थित होत्या.या कार्यक्रमात तानाजी निकम (शेती अधिकारी कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ )यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व विषद केले.
शेणखत,कंपोस्ट खत याचे फायदे तसेच जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत आवश्यक माहिती दिली.त्याचबरोबर विविध नैसर्गिक निविष्ठांचे प्रकार, ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, वापरण्याची पद्धत याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जीवामृत तयार करण्याबाबत सविस्तर आणि उपयुक्त असे मार्गदर्शन केले. अमित यमगेकर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा) यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी शेतीशाळेचे महत्त्व स्पष्ट केले. भैरीदेव सेंद्रिय शेतकरी गटाचे सचिव सूर्यकांत पाटील यांनी आभार मानले.यावेळी ओमकार संकेश्वरी (सहाय्यक कृषी अधिकारी), सौ.मनीषा पाटील (मेंटर पाणी फाउंडेशन तथा सहाय्यक कृषी अधिकारी), ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पोवार, भैरीदेव सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष दत्ता पावले,अंतू पाटील, बाळू शिवणे, तानाजी गुरव, शिवाजी पोवार, संजय गेंगे आदी शेतकरी उपस्थित होते.
आरदाळ ता. आजरा तेथे नाचणी पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
|