बातम्या

*राजर्षी शाहू सन्मान सोहळा 2026या प्रतिष्ठित आणि मानाच्या पुरस्काराने अशोकअण्णांचा गौरव

Ashokanna honored with the prestigious and esteemed


By nisha patil - 8/9/2026 2:19:33 PM
Share This News:



*राजर्षी शाहू सन्मान सोहळा 2026या प्रतिष्ठित आणि मानाच्या पुरस्काराने अशोकअण्णांचा गौरव

*आजरा(हसन तकीलदार):-आण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्वेसर्वा आणि आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोक आण्णा चराटी यांचा राजर्षी शाहू सन्मान सोहळा 2026 या प्रतिष्ठित पुरस्काराने  यथोचित गौरव करण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, समाजोपयोगी आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल अण्णा भाऊ संस्था समूह आजराचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना नवभारत-नवराष्ट्र समुहाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा "राजर्षी शाहू सन्मान सोहळा 2026" पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे.

हा पुरस्कार खासदार शाहू छत्रपती महाराज, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, शैक्षणिक क्षेत्रात नवनवे उपक्रम राबविणे तसेच हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन  अशोकअण्णा चराटी यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
 अशोकअण्णा चराटी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा भाऊ संस्था समूहाने पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समाजकल्याणाच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.


*राजर्षी शाहू सन्मान सोहळा 2026या प्रतिष्ठित आणि मानाच्या पुरस्काराने अशोकअण्णांचा गौरव
Total Views: 145