बातम्या
पट्टणकोडोलीत पतीकडून पत्नीच्या गळ्यावर कटरने वार; खुनाचा प्रयत्न
By nisha patil - 8/13/2026 2:44:56 PM
Share This News:
पट्टणकोडोलीत पतीकडून पत्नीच्या गळ्यावर कटरने वार; खुनाचा प्रयत्न
पट्टणकोडोली : हुपरी-कोल्हापूर रोडवरील तपस्या हॉटेलसमोर घरगुती कारणावरून झालेल्या वादातून श्रीशैल्य पुजारी (४३) याने पत्नी सुजाता पुजारी (३५) यांच्या गळ्यावर कटरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात सुजाता गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर जमलेल्या जमावाने श्रीशैल्य याला मारहाण केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीच्या शोधासाठी हुपरी पोलिसांनी पथक तैनात केले असून, रात्री उशिरा हुपरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
पट्टणकोडोलीत पतीकडून पत्नीच्या गळ्यावर कटरने वार; खुनाचा प्रयत्न
|