बातम्या

शंभर कोटी निधीतील रस्ते दर्जेदार व मजबूतीसाठी मनसे कोल्हापूर तर्फे जनजागृती अभियान

Awareness campaign by MNS Kolhapur for quality and strength of roads with a fund of 100 crores


By nisha patil - 12/2/2024 6:41:07 PM
Share This News:  कोल्हापूर शहरामध्ये हजारो कोटी रुपये खर्चून सुद्धा आजही खड्ड्यांमध्ये रस्ता शोधावा लागत आहे खड्डे मुक्त कोल्हापूर साठी शासनामार्फत १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांची कामे मंजूर अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेनुसार करणेसाठी मनसे कोल्हापूर तर्फे जनजागृती अभियानाचा प्रारंभ अर्धा शिवाजी पुतळा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व पुतळ्यासमोरील जनजागृती अभियानाच्या मोठ्या डिजिटल फलकाचे समोरील खड्ड्यामध्ये नारळ फोडून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
           

शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणावेळी मंजूर अंदाजपत्रकामधील नमूद मापे व बाबींनुसार काम करून घेण्यासाठी याप्रसंगी उपस्थित उपशहर अभियंता एन. एस.पाटील, ठेकेदार प्रतिनिधी सत्तार मुल्ला, कन्सल्टंट विजय कसबेकर यांना छापील पत्रके देऊन मंजूर मोजमापनुसार कामे करून घेण्यात हलगर्जीपणा दाखवल्यास मनसे स्टाईलचा खाक्या दाखवण्याचे ठणकावून सांगितले.

      तसेच रात्रीचे काम न करता दिवसाचे डांबरीकरण करणेच्या सूचना  यावेळी ठेकेदार प्रतिनिधीला घेऊन सदर रस्ते कामाच्या वेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून आपण उपअभियंता, गुणवत्ता नियंत्रक अधिकारी, कन्सल्टंट  यांनी संपूर्ण कामकाज संपेपर्यंत रस्त्यावर उभं राहून दर्जेदार  गुणवत्तेचे रस्ते करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी केले.
             

रस्त्यांच्या कामांमध्ये एक इंचाचा जरी भ्रष्टाचार केला अथवा कर्तव्यामध्ये कसूर करण्याचा छोटासा जरी प्रयत्न केला तरी मनसे स्टाईलने व कायद्याने भ्रष्ट ठेकेदार व पांढरपेशी अधिकाऱ्यांना कोल्हापुरी खाक्या दाखवण्याचे उदगार शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी काढले.
     

सदरहू  रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे कोल्हापूरकरांनी जागरूकतेने लक्ष देण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले. यानिमित्ताने शंभर कोटींच्या रस्त्यांसाठी मंजूर अंदाजपत्रकामधील लांबी रुंदी कोणत्या गुणवत्तेची किती थराचे  किती साहित्य वापरून दर्जेदार रस्ता करण्याची मिलिमीटर मधील मापे त्याच्या नकाशासह मोठ्या आकाराच्या डिजिटल फलकावर जनतेसाठी प्रदर्शित करण्यात आली.अर्धा शिवाजी पुतळा ते उभा मारुती चौक दुतर्फा दुकाने व नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले रिक्षा चालक व वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येऊन रस्त्यांच्या संदर्भी कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास ९६८९६६५६६६,९३७१७२५११५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन  जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.
    या रस्ते जनजागृती अभियानाच्या प्रारंभ प्रसंगी राजू दिंडोर्ले - जिल्हाध्यक्ष, प्रसाद पाटील-शहराध्यक्ष, निलेश धुमा -जिल्हा उपाध्यक्ष,राजू पाटील- जिल्हा उपाध्यक्ष,  अमित पाटील- जिल्हा उपाध्यक्ष, अभिजीत पाटील - तालुका अध्यक्ष करवीर, निलेश आजगावकर- शहर सचिव, अभिजीत राऊत - विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष, अजिंक्य शिंदे , यतीन होरणे, राजन हुल्लोळी, सागर साळोखे, सुहास मगदूम, मोहसीन मुलानी, विजय शिंदे, अनिकेत पाटील, रणजीत वरेकर ,सुरज कानुगडे, वैभव अस्वले, पवन राजपूत, संजय चौगुले, उत्तम वंदुरे, रणजीत  सुतार, गणेश तेरवाडे, सागर जोगी, शिवराज भोसले, अरविंद कांबळे, गणेश शिंदे इ. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. असे पत्रक शहर सचिव निलेश आजगावकर यांनी प्रसिद्धीस दिले.

 


शंभर कोटी निधीतील रस्ते दर्जेदार व मजबूतीसाठी मनसे कोल्हापूर तर्फे जनजागृती अभियान