बातम्या
बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा तहसीलदार समीर माने यांचे मार्फत राज्य सरकारला निवेदन
By nisha patil - 8/13/2026 7:41:26 PM
Share This News:
फेरीवाले, पथविक्रेते यांना सन्मानजनक रोजगारापासून वंचित करु नका
बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा तहसीलदार समीर माने यांचे मार्फत राज्य सरकारला निवेदन
आजरा(हसन तकीलदार):- दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा तहसील मार्फत राज्यसरकारला निवेदन देण्यात आले. फेरीवाले,पथ विक्रते, रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करणारे आपले शेतकरी बांधव आहेत. त्यांना सन्मानाने व्यवसाय करु द्या. आणि त्यांच्यावरील अन्याय बंद करा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पथ विक्रेते, फेरीवाले तसेच रस्त्याकडेला पालेभाजी विक्री करणाऱ्या सर्वसामान्य विक्रेत्यांना सन्मान पूर्वक व्यवसाय करण्याचा अधिकार आहे मात्र त्यांच्यावर नगर पंचायत, नगर परिषद, नगर पालिका, महानगर पालिका, व प्रशासनाच्या माध्यमातून नित्य कारवाई करून त्यांच्या मालाची नासधूस केली जाते त्यांचा जप्त केलेला माल परत दिला जात नाही सततच्या या होणाऱ्या कारवाईमुळे त्यांचे जगणेअसह्य व मेटाकुटीला आलेले आहे. अशाच नेहमीच्या त्रासाला कंटाळून बदलापूर येथील विशाल दाते नामक २८ वर्षीय तरुणाला ट्रेनखाली झोकून देत आत्महत्या करावी लागली आहे.उर्वरित महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे.
शासनाचे नियम फक्त कागदावरच आहेत अशी परिस्थिती आहे. खरे तर पथविक्रेते अधिनियम 2024 नुसार अशी कारवाई करणे वा त्यांना सन्मानजनक उपजीविका भागविण्यापासून रोखणे हे पूर्णतः गैर आहे किंबहुना सर्वोच न्यायालयाने सुद्धा अनुच्छेद 19(1) (ग) अंतर्गत व्यवसायाचा अधिकार मान्य केला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांना पथविक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची टी.व्ही.सी.ची स्थापना सर्वेक्षण आणि योजना अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत असे असतांना या सर्व गोष्टीची पूर्तता न करता उपरोक्त व्यावसायिकांना त्यांच्या सन्मानजनक रोजगारापासून वंचित केले जात आहे..हे महाराष्ट्रात सर्रास घडत आहे या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन घोषित केले आहे. त्याचा पहिला टप्पा काल निवेदन देऊन पार पडला आणि दुसरा टप्प्यात तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देण्यासाठी उपस्थितडॉ उल्हास त्रिरत्ने(प्रभारी,महाराष्ट्र राज्य, बी एम पी.)राहुल मोरे(प्रभारी, राधानगरी विधानसभा मतदार), शरद पाटील (प्रभारी, गडहिंग्लज तालुका),डॉ.सुदाम हरेर (अध्यक्ष, राधानगरी विधानसभा मतदारसंघ, ), दशरथ सोनुले (सचिव, आजरा तालुका )अमित सुळेकर, सलीम महागोंडे (प्रचारक ), नितीन राऊत,मौजूद माणगावकर,सचिन कांबळे, महेश कांबळे. आदिजण उपस्थित होते.
बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा तहसीलदार समीर माने यांचे मार्फत राज्य सरकारला निवेदन
|