बातम्या
*बहुजन मुक्ती पार्टीचे चौथे महाराष्ट्र राज्य अधिवेशन पुणे येथे संपन्न
By nisha patil - 7/27/2026 3:59:40 PM
Share This News:
*बहुजन मुक्ती पार्टीचे चौथे महाराष्ट्र राज्य अधिवेशन पुणे येथे संपन्न
*आजरा(हसन तकीलदार):- बहुजन मुक्ती पार्टी चे चौथे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २६ जुलै २०२६ रोजी पुणे येथे पार पडले.अधिवेशन मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी हजर होते या अधिवेशनचे वैशिष्ट म्हणजे की वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा घेणे तसेच आंदोलनाची दिशा ठरवणे.
कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व बहुजन मुक्ती पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी केले आपल्या जिल्ह्यातील शेतकरी,कष्टकरी, विद्यार्थी,बेरोजगार यांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत बाजू मांडली आपल्या जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास, जबरदस्तीने लादण्यात येत असलेला संकेश्वर ते बांदा तथाकथित महामार्गावरील टोल नाका, हत्ती संगोपन केंद्र, स्मार्ट मीटर मुळे होणारे नागरिकांचे आर्थिक नुकसान अशा समस्येवर राज्यव्यापी आंदोलन उभे राहिले पाहिजे त्या करिता पक्ष संघटनेमार्फत रणनीती आखून लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करून नागरिकांना या समस्येतून मुक्त करण्यात यावे अशी डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी पक्ष श्रेष्ठी समोर मागणी मांडली.
खरे पाहता आपण निवडून दिलेले आमदार,खासदार लोकप्रतिनिधिनी अशा प्रकारे संसदेत नागरिकांची बाजू मांडणे अपेक्षित आहे.नागरिकांच्या विरोधाचा विचार न करता सरकार आपल्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी कडून जनविरोधी कार्य करून घेत आहे.परंतु बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावरील लढाई लढून नागरिकांचे हक्क अबाधित ठेवणार असा या अधिवेशनात संकल्प करण्यात आला. रस्त्यावरील लढाई लढणे हा एकमेव पर्याय शिल्लक या सरकारने ठेवला आहे.बहुजन मुक्ती पार्टीच्या या लढ्याला यशस्वी करण्यासाठी नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी कृती कार्यक्रम ठरवण्यात आला. कार्यक्रमाची अध्यक्षता वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा), प्रतापदादा पाटील (प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र BMP),यांनी केली.आजरा तालुक्यातून राहुल मोरे ( प्रभारी,राधानगरी विधानसभा,BMP), डॉ.सुदाम हरेर, (अध्यक्ष,राधानगरी विधानसभा मतदारसंघ BMP), दशरथ सोनुले (सचिव,आजरा तालुका,BMP), शरद पाटील(प्रभारी,गडहिंग्लज तालुका BMP)अमित सुळेकर, (प्रचारक BMP), विजय कांबळे, शकुंतला कांबळे , सचिन कांबळे, संस्कार कांबळे,आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
*बहुजन मुक्ती पार्टीचे चौथे महाराष्ट्र राज्य अधिवेशन पुणे येथे संपन्न
|