बातम्या
धरतीची आम्ही लेकरं भाग्यवंत; चिमुकल्यांचे रंगले ‘बांधावरची शाळा’ उपक्रमात...
By nisha patil - 7/13/2026 12:25:28 PM
Share This News:
धरतीची आम्ही लेकरं भाग्यवंत; चिमुकल्यांचे रंगले ‘बांधावरची शाळा’ उपक्रमात...
सिंधुदुर्ग : गवस शुभम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हलवळ नं. २ च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘बांधावरची शाळा’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निसर्गाच्या सान्निध्यात शेताच्या बांधावर भरलेल्या या अनोख्या शाळेत विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन, निसर्ग निरीक्षण तसेच ग्रामीण जीवनाची ओळख करून देण्यात आली. हिरव्यागार शेतामध्ये प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेताना चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शिक्षकांनी विविध शैक्षणिक व प्रात्यक्षिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पारंपरिक वर्गखोलीबाहेर जाऊन शिक्षण अधिक रंजक व अनुभवाधारित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
धरतीची आम्ही लेकरं भाग्यवंत; चिमुकल्यांचे रंगले ‘बांधावरची शाळा’ उपक्रमात...
|