बातम्या
नेबापूर येथे भारतीय दलित महासंघाचा वृक्षारोपण सोहळा
By nisha patil - 7/20/2026 12:18:22 PM
Share This News:
नेबापूर येथे भारतीय दलित महासंघाचा वृक्षारोपण सोहळा
पन्हाळा प्रतिनिधी,शहानवाज मुजावर स्वामीनिष्ठा, त्याग आणि स्वराज्य भक्तीचा आदर्श जगासमोर ठेवणाऱ्या पावनखिंड रणसंग्रामाच्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय दलित महासंघ, कोल्हापूर च्या वतीने रविवार दि. १९ जुलै २०२६ रोजी नेबापूर ता. पन्हाळा येथे भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नरवीर स्वामीनिष्ठ शिवा काशिद आणि नरवीर स्वामीनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमास वंदन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रम सकाळी ठीक अकरा वाजता नरवीर शिवा काशिद यांच्या समाधी स्थळाजवळ, नेबापूर येथे कार्यक्रम पार पडला
भारतीय दलित महासंघाने "जागृतीचा किस्तव कधीही विझू देता कामा नये" - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन हा उपक्रम आयोजित केला असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर दुपारी एक वाजता नेबापूर येथेच भारतीय दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती.
यावेळी श्रीकांत कांबळे , सामाजिक कार्यकर्ते अनुप गवंडी नगरसेवक शहाबाज मुजावर, शाहरुख पेटकर, अमोल कांबळे वाघेवेकर श्रीकांत कांबळे , चंद्रकांत काळे ,विनोद कांबळे , विक्रम सामुद्रे , दिपक बानकर राहूल माने, मुनाफ पेटकर , मनोज गायकवाड , शिवा काशिद यांचे थेट वंशज आनंदा काशिद , रविंद्र काशिद , प्रविण काशिद , बाबर सर यांनी सहभाग घेतला .
नेबापूर येथे भारतीय दलित महासंघाचा वृक्षारोपण सोहळा
|