कृषी

घोषणांनी भुदरगड दणाणला; मनसेच्या शेतकऱ्यांचा अक्रोश मोर्चा उत्स्फूर्त

Bhudargad resonated with slogans MNS farmers protest was spontaneous


By nisha patil - 2/17/2026 3:28:07 PM
Share This News:



घोषणांनी भुदरगड दणाणला; मनसेच्या शेतकऱ्यांचा अक्रोश मोर्चा उत्स्फूर्त


भुदरगड : जप्त करण्यात आलेले कृषी फवारणी पंप तात्काळ परत करावेत व डॉ. युवराज येडूरे यांच्यावरील गुन्हे रद्द करावेत, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या अक्रोश मोर्चाने भुदरगड शहर दणाणून सोडले. मोर्चादरम्यान शेतकरी व मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
“दोन रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालं बेपत्ता”,
“या सरकारचं करायचं काय – खाली डोकं वर पाय”,
“निवडणूक अधिकाऱ्याचं करायचं काय – खाली डोकं वर पाय”,
“पंप जप्त करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याचं करायचं काय – खाली डोकं वर पाय”
अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो”,
“सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो”,
“शेतकरी एकजुटीचा विजय असो”
अशा जयघोषांमुळे मोर्चात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

डॉ. युवराज येडूरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले बेकायदेशीर गुन्हे तात्काळ रद्द करावेत, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. जप्त केलेले कृषी फवारणी पंप शेतकऱ्यांच्या हक्काचे असून ते तातडीने परत मिळावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी मनसेचे युवानेते डॉ. युवराज येडूरे, मनसेचे भुरगड तालुकाध्यक्ष राहुल पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष ऋषभ आमते, भुदरगड उपाध्यक्ष विश्वजीत पाटील, सचिव नितीन कांबळे, उद्योगपती प्रशांत येडूरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवार, कृष्णात भारतीय, मायकल डिसोजा, आदी तालुक्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


घोषणांनी भुदरगड दणाणला; मनसेच्या शेतकऱ्यांचा अक्रोश मोर्चा उत्स्फूर्त
Total Views: 11