बातम्या
माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन*
By nisha patil - 8/17/2026 12:34:02 AM
Share This News:
*माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन*
माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर रविवारीही पाटील कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी यशवंत निवासस्थानी भेट देऊन डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राचे व देशाचेही मोठे नुकसान झाल्याची भावना गवई यांनी यावेळी व्यक्त केली.
रविवारी दिवसभरात माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांच्या पत्नी नीलम राणे, सांगलीचे खासदार विशाल पाटील, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार निलेश लंके, माजी आमदार शिरीष कोतवाल, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, बबलू जाधव, अमर खानापुरे, अण्णासाहेब भोज, राष्ट्रीय सरपंच संसद चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, जितेंद्र भोसले, माजी आमदार सतीश चव्हाण पाटील, अभिजीत लुनिया, सचिन पवार , रामचंद्र नांद्रे गुरुजी यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यशवंत निवासस्थानी भेट देऊन डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांच्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले.
माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन*
|