बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये संस्थामाता  सुशीलादेवी  साळुंखे  जयंती उत्साहात साजरी

Birth anniversary of SansthamataSushiladevi Salunkhe


By nisha patil - 4/9/2026 3:05:25 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये संस्थामाता  सुशीलादेवी  साळुंखे  जयंती उत्साहात साजरी

“विद्यार्थ्यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समर्पणाचा अंगिकार करावा”-   प्रा. सविता वेदांते

कोल्हापूर दि. 4  :  संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे हया शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यांना श्री स्वामी विवेकानद शिक्षण संस्था उभारणीच्या कामात बहुमोल मदत केली. त्यामुळे आपल्या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे. महाराष्ट्रभर शाखाविस्तार झाला. त्यामुळे संस्थेच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.  आजच्या विद्यार्थिनींनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचा आदर्श घेऊन आयुष्य घडवावे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.सविता वेदांते यांनी केले.  त्या येथील विवेकानंद कॉलेजमधील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे स्त्री अभ्यासकेंद्र, महिला सबलीकरण कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने आयोजित संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या जयंती निमित संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे : प्रेरणादायी जीवनप्रवास या विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सौ शिल्पा भोसले हया होत्या.

            अध्यक्षीय मनोगतात प्रा शिल्पा भोसले याप्रसंगी म्हणाल्या, संस्थामाता ही गुरुदेव कार्यकर्त्यांनी दिलेली पदवी आहे.  शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याप्रमाणे संस्थामातांनी त्यागमय जीवन व्यतीत केले. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे हया शिस्तप्रिय होत्या.  संस्थामाता हया संस्थेत शिकणाऱ्या मुलांवर स्वत:च्या मुलांपेक्षा जास्त्‍ प्रेम,माया करत असत. गुरुदेव कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहत असत.  स्त्रीवाद समजून घ्यायचा असेल तर संस्थामातांना समजून घेणे गरजेचे आहे.  असे मनोगत मांडले. 

            कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, रोपास पाणी घालून व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. स्वागत व  प्रास्ताविक  प्रा. स्वाती ढगे  यांनी केले.  आभार  प्रा. शुभांगी पाटील यांनी मानले. तर सूत्रसंचालन  प्रा मंगल गवळी यांनी केले.

            या कार्यक्रमास, कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. एस के धनवडे, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्राध्यापिका  व प्रशासकीय कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते.


विवेकानंद कॉलेजमध्ये संस्थामाता  सुशीलादेवी  साळुंखे  जयंती उत्साहात साजरी
Total Views: 16