बातम्या

आमदार यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप

Black flags shown to MLA Yadravkar


By nisha patil - 11/9/2026 10:36:22 PM
Share This News:



आमदार यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप

सैनिक टाकळी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या संदर्भात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा ताफा सैनिक टाकळी गावात आला असता, पंचक्रोशीतील माजी सैनिक, पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीला विरोध आणि आंदोलनादरम्यान माजी सैनिक व शेतकऱ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ हा काळे झेंडे आंदोलन करण्यात आले. यावेळी “आमदार यड्रावकरांचा निषेध असो”, “सैनिक टाकळी एमआयडीसी रद्द झालीच पाहिजे” अशा घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनादरम्यान माजी सैनिक व शेतकऱ्यांना झालेल्या कथित मारहाणीमुळे तसेच राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा आरोप झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. गायरान जमीन गावाच्या विकासासाठी राखीव ठेवावी आणि प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसी रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी वायुसेनेचे अमर पाटील, नितीन पाटील, प्रदीप पाटील, हनुमंत पाटील, दत्तात्रय पाटील, विद्यानंद पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, शरद पाटील, संभाजी पाटील, भरत पाटील, विजय पाटील, आनंदराव चव्हाण, दिलीप पाटील, संदीप पाटील तसेच सकल मराठा समाजाचे अमर पाटील, धनाजी पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह माजी सैनिक, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.


आमदार यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप
Total Views: 96