बातम्या

ब्लॅक पँथर पक्षाच्या भिक मांगो आंदोलनाचा धसका: शिक्षण उपसंचालकांनी दिले रोष्टर सादर करण्याचे आदेश*

Black pathar


By nisha patil - 9/8/2026 1:27:58 PM
Share This News:



**ब्लॅक पँथर पक्षाच्या भिक मांगो आंदोलनाचा धसका: शिक्षण उपसंचालकांनी दिले रोष्टर सादर करण्याचे आदेश*

**आजरा(हसन तकीलदार)*:-. ब्लॅक पॅंथर पक्षाच्यावतीने करण्यात येणाऱ्या भीक मांगो आंदोलनाची दखल घेत कोल्हापूर विभागीय शिक्षण विभागाच्या शिक्षण उपसंचालक मा.प्रभावती कोळेकर यांनी कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग व रत्नागिरी शिक्षण विभागातील शाळांमध्ये होत असलेल्या चुकीच्या कारभाराची तातडीने चौकशी करण्यासाठी बिंदू नामावली प्रमाणे जागा भरलेत की नाही हे तपासण्यासाठी प्रत्येक शाळेचे रोस्टर तात्काळ 14 तारखेपर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहेत तसेच जोपर्यंत रोष्टरनुसार शिक्षकांची भरती पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही संस्थेतील शाळांमधील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे प्रस्ताव न स्वीकारण्याचे सक्त आदेश कोल्हापूर, सांगली,सातारा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

     याबाबत मागील आठवड्यात ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई व जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापुर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये एस.सी, एस.टी, ओबीसी, एन.टी, व्हीजेएनटी या प्रवर्गाच्या जागा शिल्लक असतानाही सदर आरक्षणाचे उमेदवार मिळत नसल्याचे कारण पुढे करून अनेक संस्थांचालक संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपलेच पै-पाहुणे,नातेवाईक यांची खुल्या प्रवर्गातून बेकायदेशीररित्या भरती करून घेत आहेत तसेच मागासवर्गीय उमेदवारांचे प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ केली जात आहे या आणि अशा विविध समस्या 15 ऑगस्ट पर्यंत न सोडवल्यास भीक मागो आंदोलन करून मिळालेली रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाला देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना विशेष पत्राद्वारे रोस्टर सादर करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

     आदेशामध्ये शिक्षण उपसंचालक कोळेकर यांनी म्हटले आहे की, सन 2000 सालापासून रोष्टरनुसार एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी या प्रवर्गात भरलेली पदे व रिक्त पदांचा तपशील सादर करावा, अनेक संस्थांमध्ये आरक्षणाचे नियम डावलून केलेल्या भरतीचा निकष तसेच काही आरक्षित जागांवर बोगस अपंग उमेदवारांची नियुक्ती केलेली असल्याने त्यांचे प्रमाणपत्र सादर करावे एवढेच नाही तर ज्या संस्थापकांनी रोष्टर डावलून अन्य उमेदवारांची भरती केलेली असेल तर संबंधितावर शासन नियमानुसार कोणती कारवाई केली याचा खुलासा तात्काळ सादर करावा व यापुढे एससी, एसटी,ओबीसी, व्हीजेएनटी चे रोष्टर पूर्णपणे भरल्याशिवाय अन्य कोणत्याही माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील शिक्षकांचे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी चे प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नयेत असेही पत्रकात म्हटले आहे.

     एकंदरीत ब्लॅक पॅंथर पक्षाच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी मागासवर्गीय शिक्षकांना न्याय देण्यासाठी योग्य व न्यायिक भूमिका घेतल्याने ब्लॅक पॅंथर पक्षाचे व शिक्षण उपसंचालक यांचे कोल्हापूर विभागामध्ये विशेष कौतुक होत आहे. तर शिक्षण उपसंचालक यांनी वेळेत योग्य ती कारवाई केल्यामुळे ब्लॅक पॅंथर पक्षाच्यावतीने करण्यात येणारे भिक मागो आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई व जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी दिली आहे.


ब्लॅक पँथर पक्षाच्या भिक मांगो आंदोलनाचा धसका: शिक्षण उपसंचालकांनी दिले रोष्टर सादर करण्याचे आदेश*
Total Views: 268