बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन.
By nisha patil - 3/8/2026 12:55:51 PM
Share This News:
लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून मांडल्या वंचित समाजाच्या व्यथा-प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर
विवेकानंद कॉलेजमध्ये अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन.
कोल्हापूर दि.3 : लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लोकशाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित, कष्टकरी व कामगार वर्गाचे जीवन प्रभावीपणे मांडले. अण्णा भाऊ यानी लेखन केलेल्या वारणेचा वाघ या पुस्तकातील सत्तू धर्माचा भाऊराया या ग्रामीण लोकसंगीताच्या ढंगात रचलेल्या गीताविषयी माहिती देऊन अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य् वाचून सामाजिक, समता, मानवता आणि स्वाभिमानाची मूल्ये आत्मसात करा असे आवाहन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी विद्यार्थ्यांना़ केले. ते येथील ग्रंथालयात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी इतिहास विषयाचे विभागप्रमुख डॉ. अजय पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची सामाजिक परिवर्तनातील भूमिका तसेच लोकमान्य्ा टिळक यांच्या राष्ट्रवादी विचारांचे महत्व स्पष्ट केले. या प्रदर्शनात अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा, वैजयंता, चित्रा, माकडीचा माळ यासह विविध साहित्यकृतींचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन ग्रंथालय व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व विविध कार्यक्रम आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून व अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य्ा टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक ग्रंथपाल श्री. हितेंद्र साळुंखे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अस्मिता तपासे यांनी केले.
याप्रसंगी डॉ. एकनाथ आळवेकर, प्रा.एच.व्ही.चामे, डॉ संदीप पाटील, डॉ. गोरख गायकवाड, श्री.बी.ए.नारे, सौ विजया राजेमाने, सौ प्रियांका बिडकर, श्री बी एस खोत, मंगल गुरव, प्रतिक पानारी उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन.
|