बातम्या

पुस्तके माणसाचे जीवन समृध्द् करतात – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

Books enrich human life  Principal Dr Milind Hujare


By nisha patil - 10/8/2026 12:34:56 PM
Share This News:



पुस्तके माणसाचे जीवन समृध्द् करतात – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

 कोल्हापूर दि.10 : वाचन हे ज्ञानाचे दालन उघडणारी गुरुकिल्ली आहे.  प्रत्येकाने ज्ञानासाठी वाचनाची वाट धरून समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरविला पाहिजे. पुस्तके वाचल्याने माणसाचे जीवन समृध्द होते. 

पुस्तकातून संपादित केलेले  ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना स्वावलंबी व सुसंस्कारी बनविणेहीच शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या  बापूजींच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल.   असे  प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले.

ते येथील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या 39 व्या स्मृती दिना निमित्त ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे  यांच्या हस्ते करण्यात आले.   ग्रंथ प्रदर्शनात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, साने गुरुजी, महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ मांडण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत  ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक ग्रंथपाल श्री. हितेंद्र साळुंखे  यांनी मानले.

याप्रसंगी डॉ. राजश्री पाटील, प्रा. वर्षा शिंदे,  डॉ संदीप पाटील व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.  ग्रंथप्रदर्शनाचे संयोजन श्री.बी.ए.नारे, सौ विजया राजेमाने, सौ प्रियांका बिडकर, श्री बी एस खोत, मंगल गुरव, प्रतिक पानारी, श्री सुरेश इंगळे यांनी केले.


पुस्तके माणसाचे जीवन समृध्द् करतात – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे
Total Views: 11