बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ज्वलंत आक्रोश!

Burning outcry of onion farmers


By Administrator - 3/18/2026 1:17:00 PM
Share This News:



कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ज्वलंत आक्रोश!
 

52 पिशव्या 2803 किलो कांदा विकून 1803 रुपये शेतकऱ्याच्या हातात आलेत कालची पट्टी,
आज शेतकरी कांदा पिकवतोय… पण त्याच्या हातात काहीच उरत नाही. जमिनीत घाम गाळून, कर्ज काढून, दिवस-रात्र मेहनत करून उभं केलेलं पीक बाजारात नेताच मातीमोल होतंय. उत्पादन खर्च ₹22-₹25 किलो आणि भाव मिळतो ₹4-₹6—किलो हा व्यवहार नाही, हा शेतकऱ्याच्या जिवाशी चाललेला खेळ आहे!

 

ज्याच्या कष्टावर देशाची अर्थव्यवस्था चालते, तोच शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याखाली दबतोय. घर चालवायचं, लेकरांचं भविष्य बघायचं, आणि वर तोट्यात विक्री करायची — हा न्याय आहे का? सरकार योजना जाहीर करतं, आकडे मांडतं… पण त्या कागदावरच राहतात. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय येतं? फक्त निराशा!
 

शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसत नाही का? कष्टाचं चीज नाही, मेहनतीला मान नाही — मग शेती करायची तरी कशी?आज शेतकरी शांत आहे… पण आतून पेटलेला आहे!हा आवाज दाबून ठेवता येणार नाही.कारण लक्षात ठेवा —शेतकरी उभा राहिला, तर व्यवस्था हलते…
भारतातील शेतकरी जागा झाला, तर सरकार  पाडायला वेळ लागणार नाही! शेतकरी वाचला तरच देश वाचेल!


कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ज्वलंत आक्रोश!
Total Views: 9