बातम्या

भाजपच्या कागलमधील तिरंगा रॅलीत देशभक्तीचा जल्लोष

Celebration of patriotism at the BJP's Tiranga Rally in Kagal


By nisha patil - 8/14/2026 8:55:37 PM
Share This News:



भाजपच्या कागलमधील तिरंगा रॅलीत देशभक्तीचा जल्लोष

विद्यार्थी,युवक व नागरिकांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग

कागल, प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कागल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवहनानुसार भाजपच्यावतीने काढलेल्या भव्य तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमून गेला.

शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, नगराध्यक्षा सविता माने, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, राजे अखिलेशसिंह घाटगे यांच्यासह विविध मान्यवर रॅलीत सहभागी झाले.रॅलीच्या प्रारंभी गैबी चौकातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रामदैवत गहिनीनाथ गैबीपीर चे मान्यवरांनी मनोभावे दर्शन घेतले.भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले आणि रॅलीस प्रारंभ झाला.

गैबी चौकातून शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. तेथे मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तिरंगा हातात घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. देशभक्तीपर घोषणा, तिरंग्याची सजावट आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेला जनसमुदाय यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,भरत पाटील,बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, राजे बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक एम. पी. पाटील, शाहूचे संचालक रमेश माळी, सतीश पाटील, सुनील मगदूम, शिवसिंह घाटगे, जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले, काकासो सावडकर,विवेक कुलकर्णी,राजेंद्र जाधव,पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते,अनिलकुमार हेगडे शिवसिंह घाटगे,कागलचे  नगरसेवक, एकनाथ पाटील,अमर पाटील, एम.बी. पाटील,अशोक पाटील,युवराज कोईगडे,चंद्रकांत पाटील,अरूण तोडकर, चंद्रकांत दंडवते यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा जागर
कागलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत विविध समाजघटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी देशभक्तीच्या घोषणा देत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. रॅलीच्या निमित्ताने शहरात राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.


भाजपच्या कागलमधील तिरंगा रॅलीत देशभक्तीचा जल्लोष
Total Views: 15