राजकीय

केंद्र सरकार व भाजपचं न्यायालयात तोंड फुटलं

Central government and BJP clash in court


By nisha patil - 2/27/2026 6:46:50 PM
Share This News:



केंद्र सरकार व भाजपचं  न्यायालयात तोंड फुटलं

आरोपातून केजरीवाल, सिसोदिया निर्दोष 

भाजप, केंद्र सरकार व सीबीआयचा  खोटेपणा सिद्ध झाला. कथित दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया निर्दोष ठरवले आहे. तुम्ही पुराव्याविनाच आरोपपत्र दाखल केले, या शब्दांत दिल्लीतील न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे. सत्तेसाठी सीबीआय, ईडी या तपास यंत्रणांचा दुरुपयोग करण्याचा डाव भाजपच्या अंगलट आला आहे. 
 असा काही घोटाळा होता, असे दिसत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. आप नेत्यांवर आरोप होता दोन हजार कोटी रुपये घोटाळ्याचा. पण आरोपपत्रात तसा पुरावाच नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. विरोधकांवर खोटे आरोप करून, त्यांना बदनाम करून, तुरुंगात टाकण्याचं भाजपचं षडयंत्र या प्रकरणात सिद्धच झालं आहे. 
  सीबीआयने अरविंद केजरीवाल 5 महिने तर सिसोदिया यांना 17 महिने तुरुंगात ठेवले होते. खा. संजय सिंह व आणखीही काहींना अटक केली  होती. अटकेमुळे अरविंद केजरीवालना मुख्यमंत्रिपद व सिसोदियाना उपमुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं.


केंद्र सरकार व भाजपचं न्यायालयात तोंड फुटलं
Total Views: 8