बातम्या
एकल मातांच्या पाठीशी चंद्रकांतदादा पाटील; १० हजारांपर्यंत शैक्षणिक मदत!
By nisha patil - 10/9/2026 1:26:05 PM
Share This News:
एकल मातांच्या पाठीशी चंद्रकांतदादा पाटील; १० हजारांपर्यंत शैक्षणिक मदत!
एकल माता आणि त्यांच्या पाल्यांच्या पाठीशी आधाराचा हात देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एकल माता, एकल विद्यार्थी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोल्हापुरातील महाराष्ट्र हौसिंग सोसायटी येथे चंद्रकांतदादा पाटील सहाय्यता कक्षाच्या वतीने महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकल माता आणि त्यांच्या पाल्यांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू देण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १४५ एकल मातांची नोंद झाली असून, आणखी गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. विशेष म्हणजे, एकल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत, तर आवश्यक औषधांवर ५० टक्के सवलत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दर दोन महिन्यांनी या कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या गरजेनुसार मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास देणारा हा उपक्रम ठरत आहे.
एकल मातांच्या पाठीशी चंद्रकांतदादा पाटील; १० हजारांपर्यंत शैक्षणिक मदत!
|