बातम्या

*व्हिक्टोरिया पुल परिसरात स्वच्छता व सुलगाव येथील गायरन मध्ये वृक्षारोपण ,

Cleanliness in the Victoria Bridge


By nisha patil - 8/26/2026 11:44:19 PM
Share This News:



*व्हिक्टोरिया पुल परिसरात स्वच्छता व सुलगाव येथील गायरन मध्ये वृक्षारोपण ,

विद्या मंदिर सुलगाव मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध सामाजिक उपक्रम

*आजरा(हसन तकीलदार ):- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या अंतर्गत फार्मर कप 2026 मधील स्पर्धक भावेश्वरी शेतकरी गट, सुलगाव यांच्या वतीने १०० वर्षा पेक्षा जुना असलेला ब्रिटिश कालीन व्हिक्टोरिया  पूलाची स्वच्छता भावेश्वरी गटाच्या सदस्यांनी  व्हिक्टोरिया पूलावर व रामतीर्थ धार्मिक स्थळावर गाण्यांची रचना करत व म्हणत  स्वच्छता मोहीम तन्मयतेने आणि आनंदमय वातावरणात राबवली. या जुन्या  पुलावरून सध्या वाहतूक बंद असल्या कारणाने पुलाची अवस्था एकदम बिकट झाली होती खूप अस्वच्छता होती पण या रस्त्यावरून बरेच शेतकरी रहदारी करत असल्याने स्वच्छता करणे खूप आवश्यक होतं.  

ही सामाजिक कार्याची भान ठेवून भावेश्वरी शेतकरी गट सुलगाव यामधील शेतकरी सदस्य यांनी या उपक्रमांतर्गत विक्टोरिया पूल परिसराची स्वच्छता करून परिसरातील गवत, झुडपे आणि कचरा काढून अस्वच्छता दूर करण्यात आली. या कार्याचे कौतुक येजा करणाऱ्या नागरिकांनी केली.  त्याचबरोबर   पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण सुलगाव हद्दीतील गायरान येथे करण्यात आले.गटातील सर्व सदस्यांनी  सुलगाव हद्दीतील गायरान मध्ये 200 देशी वृक्षरोपांची लागवड केली त्यामध्ये जांभूळ, वड,बेल पौराणिक आणि देशी वृक्षांचा समावेश केला आहे.   वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.  तसेच शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्यामंदिर सुलगाव येथील 28 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ही या गटातील सर्व सदस्यांनी मिळून केलेली आहे याचे कौतुक गावातील नागरिकांनी भरभरून केले .
 

यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.नंदिनी डोंगरे, भावेश्वरी शेतकरी गटाच्या अध्यक्षा सौ. विजया वरदेकर,गटाचे निमंत्रक विश्वास देसाई, ओंकार खवरे, संजय डोंगरे ,गटातील सदस्य परसराम डोंगरे, विमल लांडे, दिपाली खवरे, अर्चना डोंगरे, अण्णा डोंगरे, पांडुरंग कदम, जयवंत खवरे, पूनम कोंडुसकर, नंदा डोंगरे , नंदिनी डोंगरे, पांडुरंग कदम आणि भावेश्वरी शेतकरी गटाचे सदस्य आणि सर्व सदस्यांचे कुटुंबीय या सर्व उपक्रमात उत्स्फूर्तपणे  सहभागी होते त्याचप्रमाणे  सौ. मनिषा धनाजी पाटील  मेंटर पाणी फाउंडेशन तथा सहाय्यक कृषी अधिकारी यांनीही या सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.


*व्हिक्टोरिया पुल परिसरात स्वच्छता व सुलगाव येथील गायरन मध्ये वृक्षारोपण ,
Total Views: 143