बातम्या
*मेघोली आणि बांद्राई धनगर वाड्यावरील कारवाईचा निषेध करीत कारवाई करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या वर चौकशी करून निलंबित करण्याची मागणी
By nisha patil - 1/8/2026 7:29:44 PM
Share This News:
*मेघोली आणि बांद्राई धनगर वाड्यावरील कारवाईचा निषेध करीत कारवाई करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या वर चौकशी करून निलंबित करण्याची मागणी
(आजरा हसन तकीलदार)* चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगरवाडा आणि भुदरगड तालुक्यातील मेघोली धनगरवाडा येथील गरीब धनगर कुटुंबावर त्यांची शेती, घरे नासधूस करून ऐन पावसाळ्यात त्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम वन खात्याने केले आहे. वन खात्याच्या या कृत्याचा जाहीर निषेध करीत ही कारवाई कोणाच्या आदेशाने झाली त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, जे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते त्यांच्यावर त्यांचे निलंबन केले पाहिजे. अशीही मागणी श्रमिक मुक्ती दल वनाधिकार संघर्ष समितीने निवेदनातुन केली आली आहे.आजरा तहसीलदार समीर माने यांना हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,खरंतर 2006 आणि 2008 चा वनाधिकार कायदा झाल्यानंतर पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी आणि पारंपारिक वननिवासी ना जंगल जमीन व जंगलाचे अधिकार मिळाले आहेत. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी न करता त्यांना जंगलातूनच हद्दपार करणे त्यांचे संसार उध्वस्त करणे ही बाब कायद्याच्या विरोधात आहे. म्हणूनच या बाधित धनगर कुटुंबांना ताबडतोब न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आज श्रमिक मुक्ती दल वनाधिकार संघर्ष समिती आजरा यांच्या वतीने तहसीलदार आजरा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर कॉम्रेड संपत देसाई, प्रकाश मोरस्कर,संजय तरडेकर,युवराज जाधव, नामदेव भगरे,देविदास शेडगे,संतोष शेडगे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
*मेघोली आणि बांद्राई धनगर वाड्यावरील कारवाईचा निषेध करीत कारवाई करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या वर चौकशी करून निलंबित करण्याची मागणी
|