बातम्या

वरिष्ठ नेते मिळून काँग्रेस एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करणार : आ. सतेज पाटील यांचा निर्धार

Congress will try to stay united with senior leaders


By nisha patil - 12/2/2024 6:41:57 PM
Share This News:पांडुरंग फिरींगे  कोल्हापूर – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे, आमची दुसरी पिढी सध्या काँग्रेसचं काम करते आहे. वरिष्ठ नेते मिळून काँग्रेस एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार  आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

आ. सतेज पाटील म्हणाले कि, सकाळपासून 20 ते 22 आमदारांशी   मी बोललो, 2 दिवसात अशोक चव्हाण यांच्याबाबत स्पष्टता येईल. त्यानंतर त्यावर बोलू शकेन. बिहार आणि झारखंडमध्ये भाजपनं विरोधक संपवले तीच परिस्थिती महाराष्ट्रात बघायला मिळतेय. मूळ भाजपचे पदाधिकारी नाराज असल्याची खदखद भाजपमध्ये बघायला मिळतं आहे.तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहून काम करणार आहोत.


वरिष्ठ नेते मिळून काँग्रेस एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करणार : आ. सतेज पाटील यांचा निर्धार