बातम्या
*स्वातंत्र्य दिनानिमित्य आजरा युथ कव्हरेज फाउंडेशनचे विधायक व स्तुत्य उपक्रम
By nisha patil - 8/16/2026 11:39:27 PM
Share This News:
*स्वातंत्र्य दिनानिमित्य आजरा युथ कव्हरेज फाउंडेशनचे विधायक व स्तुत्य उपक्रम
आजरा(हसन तकीलदार):-15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आजरा युथ कव्हरेज फाउंडेशनच्या वतीने विद्या मंदिर मेंढोली ता. आजरा येथे विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उज्वल भाविष्यासाठी सहकार्य करणे या उदात्त हेतूने विद्या मंदिर मेंढोली येथील विद्यर्थ्यांना डिजिटल पाट्या वितरीत करण्यात आल्या. तसेच श्रावणी सुतार हिने 300:पैकी 270 गुण प्राप्त करून शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बुरहान खेडेकर, जुबेर बागवान, सुजल कांबळे, मुआज काकतिकर, आफताब लाडजी, मुआज नेसरीकर, अजीम लमतुरे, बुरहान शेख यांच्यासह शिक्षकवृंद, ग्रामस्थ आदिजण उपस्थित होते.
*स्वातंत्र्य दिनानिमित्य आजरा युथ कव्हरेज फाउंडेशनचे विधायक व स्तुत्य उपक्रम
|