बातम्या
पन्हाळ्यात गणेश मंडळांची समन्वय बैठक - "मंडळांनी कायद्यात राहावे तर ते फायद्यात राहतील" - पोलीस निरीक्षक चौखंडे
By nisha patil - 10/9/2026 1:22:44 PM
Share This News:
पन्हाळ्यात गणेश मंडळांची समन्वय बैठक - "मंडळांनी कायद्यात राहावे तर ते फायद्यात राहतील" - पोलीस निरीक्षक चौखंडे
पन्हाळा प्रतिनिधि,शहाबाज मुजावर गणेशोत्सव 2026 शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी पन्हाळा पोलीस ठाण्याच्यावतीने समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीकृष्ण हॉल, पडळ फाटा येथे सायंकाळी 7.05 ते 8.40 या वेळेत झालेल्या बैठकीस पडळ, माजगाव, येवळुज, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे, कसबा ठाणे, सातार्डे, महाडिकवाडी व माळवाडी गावांतील सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी असे सुमारे 150 ते 200 नागरिक उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक चौखंडे यांनी मंडळांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. मूर्तीच्या ठिकाणी किमान दोन स्वयंसेवक कायम ठेवावेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, व्हिडिओ प्रसारित करू नयेत आणि असा मजकूर आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा.
गणेश मंडपाचा आकार 10 बाय 12 फूट मर्यादेत ठेवावा, मिरवणुकीतील डॉल्बी, लाइटिंग मालकांची माहिती पोलिसांना द्यावी, विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करावी आणि ध्वनी प्रदूषण नियम पाळावेत, असे निर्देश देण्यात आले. तसेच अमली पदार्थांबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे आणि 'गणराया अवॉर्ड' मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
पन्हाळ्यात गणेश मंडळांची समन्वय बैठक - "मंडळांनी कायद्यात राहावे तर ते फायद्यात राहतील" - पोलीस निरीक्षक चौखंडे
|