बातम्या
*प्रभाग क्र. 17 मधील अंगणवाडीला नगरसेविका लिचम यांची भेट बालकांसोबत स्वातंत्र्यदिन केला उत्साहात साजरा*
By nisha patil - 8/16/2026 11:35:18 PM
Share This News:
*प्रभाग क्र. 17 मधील अंगणवाडीला नगरसेविका लिचम यांची भेट बालकांसोबत स्वातंत्र्यदिन केला उत्साहात साजरा*
आजरा(हसन तकीलदार):- प्रभाग क्रमांक 17 मधील अंगणवाडी क्रमांक 14 येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य ध्वजपूजन व लहान मुलांसाठी देशभक्तीपर नृत्य कार्यक्रम अंगणवाडी सेविका चिकुर्डे मॅडम यांनी आयोजित केला होता. या लहान मुलांना प्रोत्साहन देऊन अंगणवाडी शिक्षिकाचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका प्रा.पूनम लिचम यांनी आवर्जून भेट दिली. या कार्यक्रमासाठी लिचम यांना खास आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी नगरसेविका मॅडम आणि चिकुर्डे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अधिकमाप फी भरून आपण आपल्या बालकांना खाजगी शाळेत दाखला घेतो परंतु त्यापेक्षाही जास्त या सरकारी अंगणवाडीत मुलांना संस्कार देऊन मुलांची काळजी घेतली जाते. माझे प्रभागातील सर्वांना आवाहन आहे की अंगणवाडी मध्ये आपल्या मुलाना दाखल करावे आणि याचा लाभ घ्यावा. यावेळी अंगणवाडीचे कौतुक करताना पुढे लिचम म्हणाल्या की,लहान मुलांना प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या मनामध्ये देशभक्ती रुजवणारा कार्यक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.अशा प्रकारे आपल्या प्रभागांमधील अंगणवाडीमध्ये चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला आहे.यावेळी अंगणवाडी शिक्षिका, सेविका आणि पालक उपस्थित होते.
*प्रभाग क्र. 17 मधील अंगणवाडीला नगरसेविका लिचम यांची भेट बालकांसोबत स्वातंत्र्यदिन केला उत्साहात साजरा*
|