बातम्या
शेतातील इलेक्ट्रिक मोटार दुरुस्ती करताना करंट लागून एकाचा मृत्यू*
By nisha patil - 11/8/2026 9:08:42 PM
Share This News:
**शेतातील इलेक्ट्रिक मोटार दुरुस्ती करताना करंट लागून एकाचा मृत्यू*
**आजरा(हसन तकीलदार)*:-शेतातील पाण्याची मोटार दुरुस्ती करताना शॉक लागून श्रावण गणपती वाजे (वय वर्षे 59)रा. दाभील ता. आजरा यांचा मृत्यू झाला. याबाबत नंदकुमार आनंदराव वाजे व्यवसाय शेती रा. दाभील यांनी आजरा पोलीस स्टेशनला नोंद दिली आहे.
याबाबत आजरा पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 11/08/2026 रोजी सकाळी 09:30 वाजता झोटिंगमाळ नावाच्या गट नं. 148 दाभील ता. आजरा येथील शेतामध्ये मयत श्रावण गणपती वाजे (वय 59)रा. दाभील हे आपले वरवा नावाच्या शेतातील भाताला पाणी लावण्याच्या उद्देशाने झित्रे यांचे झोटिंगमाळ नावाच्या शेतातील विहिरीच्या मोटरीची दुरुस्ती करीत असताना सदर मोटरीचा शॉक लागून मयत झाल्याचे सांगण्यात येत आहे. नंदकुमार आनंदराव वाजे यांनी दिलेल्या वर्दीनुसार सहापोलीस निरीक्षक बाबासो सरवदे यांचे आदेशानुसार पो. हे. कॉ. कांबळे यांनी नोंद घेतली असून पो. हे. कॉ. तडवी हे पुढील तपास करीत आहेत.
श्रावण वाजे यांचे इलेक्ट्रिक साहित्य व उपकरणे दुरुस्तीचा व्यवसाय होता अत्यंत मनामिळाऊ आणि हसतमुख व्यक्तिमत्व असलेले श्रावण यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहीत मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.
शेतातील इलेक्ट्रिक मोटार दुरुस्ती करताना करंट लागून एकाचा मृत्यू*
|