बातम्या
युवासेना कोल्हापूर जिल्हाच्या वतीने गडहिंग्लज येथे निदर्शने व निषेध
By nisha patil - 7/24/2026 5:24:06 PM
Share This News:
युवासेना कोल्हापूर जिल्हाच्या वतीने गडहिंग्लज येथे निदर्शने व निषेध
विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या आ. सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा निषेध करण्यात आला.
कागल प्रतिनिधी अजित बोडके नीट पेपरफुटी, टीईटी पेपर फुटी, विविध भरती परीक्षांमधील कथित घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात तसेच दिल्लीच्या जंतर-मंतरवर आपल्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराचा तीव्र निषेध करण्यात आला.
परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी, पेपरफुटी प्रकरणे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अवधुत पाटील युवासेना जिल्हा प्रमुख, प्रकाश रावळ, वसंत नाईक, बाळू कुंभार, सुधाकर जगताप, महेश पाटील, कृष्णा पाटील, महेश भोसले, कृष्णा कांबळे, तेजस घेवडे, विशाल चव्हाण, ढुंडेश नवलगुदे, विकास दिवटी, मनोज नाईक, शकील मुल्ला, सुयेश पाटील, विलास यमाटे, दिगंबर पाटील, सुरेश हेब्बाळे, संभाजी येडूरकर, मनीष हावळ, पंकज चौगुले, सुजित मोरे, हरिश्चंद्र पाटील, प्रथमेश खोत, लक्ष्मण पाटील, संतोष कांबळे, नितीन ससाणे, ओंकार ससाणे, कुणाल ससाणे, सुखदेव, ससाणे महादेव ससाणे, यासर उटी, अमर रणदिवे, महेश सबळे, तुकाराम वाघराळकर, तृप्ती वाघराळकर, स्वरुप घबाडे उपस्थित होते
यावेळी शिवसैनिक व युवसैनिक यांनी सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
युवासेना कोल्हापूर जिल्हाच्या वतीने गडहिंग्लज येथे निदर्शने व निषेध
|