बातम्या

*नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

Deposit the installments of the Namo Shetkari Mahasanman Nidhi


By nisha patil - 2/9/2026 11:19:36 PM
Share This News:



*नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

*रिपब्लिकन सेनेचे आजरा तहसीलदार यांना निवेदन

*आजरा(हसन तकीलदार):-नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हफ्ते वेळेत जमा नसलेमुळे शेतकऱ्यांच्या अडचण निर्माण होत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज असून योजनेचा नववा व दहावा हफ्ता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावे असे निवेदन रिपब्लिकन सेनेने आजरा तहसीलदार यांना दिले आहे.
   

 निवेदनात म्हटले आहे की,नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा नववा व दहावा हप्ता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही सोडलेला नाही. तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च असा एक वर्षा मध्ये तीन हप्ते मिळतात. असा शासन निर्णय झालेला आहे.

तरी या आधारे नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते मिळतात. तरी राज्य सरकारने नोव्हेंबरचा आठवा हप्ता ऑगस्ट 2025 ला सोडला. त्यानंतर डिसेंबर ते मार्च 2026 चा नववा हप्ता व एप्रिल ते जुलै 2026 चा दहावा हप्ता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही सोडलेला नाही. शेतीसाठी लागणारी बियाणे, खते, कीटकनाशके व शेतीसाठी लागणारे औजारे, औषधे यांचे दर वाढल्यामुळे गोरगरीब शेतकऱ्याला महागाईचे चटके सोसावे लागत आहेत.

अशातच नमो शेतकरी महासन्मान निधीची हप्ते वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी दिसून येत आहे. तसेच राज्य सरकारवरचा विश्वास उडत आहे. तरी नमो शेतकरी महासन्माननिधीचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर राज्य सरकारने जमा करावे. अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर अविनाश कांबळे, गोपाळ होण्याळकर, परशुराम कांबळे, विजय कांबळे, नितीन ससाणे, शरद पाटील, नंदकुमार कांबळे, शामराव कांबळे, शंकर कांबळे, मधुकर कांबळे, उत्तम कांबळे, मारुती कांबळे, आनंदा पारके, विजयंद्र कांबळे, प्रकाश कांबळे आदींच्या सह्या आहेत.


*नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा
Total Views: 2973