विशेष बातम्या
निगवे खालसाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार – भारत आमते
By nisha patil - 6/2/2026 4:15:16 PM
Share This News:
निगवे खालसाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार – भारत आमते
निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून उभा राहणारा भारत आमते हे केवळ उमेदवार नाही, तर जनतेच्या समस्यांवर लक्ष ठेवणारा, त्यांच्या विश्वासाचा प्रतीक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रामाणिक वारसा जपणारा, गावच्या मातीतील हा नेता शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि सामान्य माणसाच्या अडचणी प्रत्यक्ष अनुभवतो आणि त्यावर निर्भयपणे काम करतो.
भारत आमते यांची ओळख म्हणजे स्वच्छ प्रतिमा, कामातून बोलणारी शैली आणि निर्भय भूमिका. सत्ता हे साधन मानून मतदारांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढणारा हा शिवसैनिक, निगवे खालसा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार करतो. हेच बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा आहे. मतदारांनी आपले बहुमोल मत भारत आमते यांच्याच “मशाल” चिन्हाला देऊन, बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा हा संधीचा क्षण आहे.
निगवे खालसाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार – भारत आमते
|