बातम्या

देवर्डे हायस्कूल येथे झेन अल्फा कडून जादूच्या प्रयोगाने अंधश्रद्धेची चिरफाड*

Devarde


By nisha patil - 8/23/2026 11:55:27 AM
Share This News:



**देवर्डे हायस्कूल येथे झेन अल्फा कडून जादूच्या प्रयोगाने अंधश्रद्धेची चिरफाड*

**आजरा(हसन तकीलदार)*:-देवर्डे या आजरा येथील हायस्कूल मध्ये डॉ . नरेंद्र दाभोळकर यांच्या बलीदान दिनाच्या निमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाचे महत्त्व, श्रद्धा व अंधश्रध्दा याविषयावर मार्गदर्शन करीत जादूचे प्रयोग आजरा तालूका अंनिसचे कार्याध्यक्ष कॉ.काशिनाथ मोरे यांनी सादर केले, त्या प्रयोगांद्वारे पोलखोल करण्याचे काम अत्यंत उत्साहात झेन अल्फा ने केले .

प्रास्ताविक करताना अंनिसचे तालुका उपाध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी या देशातील अनिष्ठ रूढी परंपरा आणि जादूटोणा यांना विरोध करून समाजाला जागृत करण्यासाठी प्रबोधन केले.त्यांची हत्या करण्यात आली.पण त्यांचे विचार लोकांच्या प्रर्यत पोहचवण्याचे काम, अंनिस संघटना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी मोरे यांनी तांब्यातून पाणी गायब करणे ,नजरेने केळीचे तुकडे करणे, डोळे बांधून संख्या ओळखने इत्यादी प्रयोगातून विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. वैज्ञानिक दृष्टिकोन व जाणीवा जागृत झालेल्या मुलींनी आपण ही झेन अल्फा असलेचे दाखवत प्रयोगांची पोलखोल करण्यात हुशारी दाखवली यासाठी मोरे यांनी त्यांचे कौतुक करत समाजातील भोंदू बाबांच्या पासून सावध राहावे असा सल्ला दिला. यावेळी कॉ . संजय घाटगे, मुख्याध्यापक सी.बी.धुरे, एम.एम.नावलगी, धनाजी चाळके,राजू गुरव, मारूती बुरूड, शरद परूळेकर तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.स्वागत व सुत्रसंचलन आर.वाय.पाटील यांनी केले तर आभार डी.एम. शिखरे यांनी मानले.


देवर्डे हायस्कूल येथे झेन अल्फा कडून जादूच्या प्रयोगाने अंधश्रद्धेची चिरफाड*
Total Views: 378