बातम्या
दाभील येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
By nisha patil - 8/8/2026 7:50:59 PM
Share This News:
**दाभील येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
**आजरा(हसन तकीलदार)*:- दिनांक 08 ऑगस्ट 2026 रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम मौजे दाभिल तालुका आजरा येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवराज पाटील (सरपंच दाभिल )उपस्थित होते.या कार्यक्रमात डॉ. शैलेश कुंभार (प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र राधानगरी) यांनी भात रोप लागण करताना अवश्यक उपाय योजना, चार सूत्री रोप लागण याबाबत माहिती दिली. त्यामध्ये येणाऱ्या हिरवळीच्या खतांचा वापर करणे, युरिया ब्रिकेट चा वापर केल्यामुळे होणारी उत्पन्नात वाढ, नियंत्रित रोग लागण याबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच प्रगतशील शेतकरी कृष्णा लाड यांच्या प्रक्षेत्रावर चार सूत्री पद्धतीने भात रोप लागण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून डॉ. शैलेश कुंभार यांनी मार्गदर्शन केले.पालकमंत्री कोल्हापूर नामदार प्रकाश आबिटकर यांच्या वतीने दाभिलचे प्रगतशील शेतकरी शरद मस्कर यांची तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती आजरा च्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अमित यमगेकर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक )यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. नामदेव पाटील यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. माधुरी सुतार, सौ. मनीषा पाटील (मेंटर पाणी फाउंडेशन तथा सहाय्यक कृषी अधिकारी पेरणोली )तसेच कमलाकर पाटील , जनार्दन पाटकर,पांडुरंग राणे,नम्रता नार्वेकर,प्रतिभा निवळे,रंजना कदम आदी शेतकरी उपस्थित होते.
दाभील येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
|