बातम्या

शेंडूर येथील मशान शेडची दुरावस्था; मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थांमध्ये संताप

Dilapidated state of the cremation shed at Shendur


By nisha patil - 8/15/2026 2:09:20 PM
Share This News:



शेंडूर येथील मशान शेडची दुरावस्था; मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थांमध्ये संताप
 

 कागल प्रतिनिधी: अजित बोडके शेंडूर, ता. कागल: शेंडूर (ता. कागल) येथील मशानभूमीतील शेडची अत्यंत दुरावस्था झाली असून तेथे वीज व्यवस्था देखील नाही. शेडचे पत्रे वाऱ्याने उडून गेले आहेत. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ठेवण्यासाठी बेंच / बॅरीगेटची व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

पावसाळ्यात तर या ठिकाणी अंत्यविधी करणे अधिकच कठीण झाले आहे. छत नसल्याने पावसात उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. रात्रीच्या वेळी लाईट नसल्याने अंधारात अंत्यविधी उरकण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. अत्यंत आवश्यक असणाऱ्या या सुविधांकडे ग्रामपंचायत व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि संतापाची भावना आहे.

याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, मशानभूमी ही प्रत्येक गावासाठी अत्यावश्यक बाब आहे. तिची तातडीने दुरुस्ती करून पत्रे बसवावेत, लाईटची व्यवस्था करावी आणि सुरक्षा भिंत व बॅरीगेट बसवावेत अशी मागणी होत आहे.

प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

 


शेंडूर येथील मशान शेडची दुरावस्था; मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थांमध्ये संताप
Total Views: 16