बातम्या
*अंतर कमी झाले आता तिकीट दरही कमी करा -उबाठाची मागणी
By nisha patil - 7/21/2026 3:34:48 PM
Share This News:
*अंतर कमी झाले आता तिकीट दरही कमी करा -उबाठाची मागणी
*आजरा(हसन तकीलदार):-संकेश्वर बांदा महामार्ग झाल्यामुळे गडहिंग्लज, आजरा ते आंबोली पर्यंतची वळणे कमी केली असल्याने गावातील अंतरही कमी होऊन स्टेजही कमी झालेली आहेत त्यामुळे तिकिटाचे दर कमी करावेत अशी मागणी उबाठा तर्फे आजरा आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर बांदा महामार्ग होण्यापूर्वी रस्त्यावर वळणे जास्त प्रमाणात होती त्यामुळे आंबोली, आजरा ते गडहिंग्लज पर्यंतच्या गावातील आंतर जास्त होते परंतु संकेश्वर बांदा महामार्ग झाल्यापासून या मार्गावरील वळणे कमी झालेली आहेत. त्यामुळे बसचे अंतर व स्टेजही कमी झालेली आहेत. तरी सदर मार्गावरील अंतराचे सर्व्हे होऊन स्टेज कमी झालेल्या बस फेऱ्यांचे तिकीट दर कमी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर संभाजी पाटील(उपजिल्हा प्रमुख), युवराज पोवार(तालुका अध्यक्ष), समीरभाई चांद(शहर प्रमुख), दिनेश कांबळे, हरिश्चंद्र व्हराकटे, महेश पाटील, अमित गुरव, महादेव गुरव, उमेश डेळेकर, विजय कांबळे आदींच्या सह्या आहेत.
*अंतर कमी झाले आता तिकीट दरही कमी करा -उबाठाची मागणी
|