बातम्या

प्राची खेतानी यांचे वतीने व श्री. भवानीसिंह घोरपडे सरकारांच्या सहयोगातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Distribution of educational materials to students on behalf of Prachi Khetani


By nisha patil - 12/8/2026 3:29:51 PM
Share This News:



प्राची खेतानी यांचे वतीने व श्री. भवानीसिंह घोरपडे सरकारांच्या सहयोगातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

घोसरवाड, बाबरवाडी व दत्तवाड कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, शालेय साहित्य व खाऊचे वाटप............ 

दत्तवाड, दि. ११ ऑगस्ट २०२६ (प्रतिनिधी : आचिन हेरवाडे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने दत्तवाड परिसरात स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
 

मा.प्राची खेतानी यांचे वतीने, दत्तवाडचे श्री.भवानीसिंह घोरपडे यांच्या प्रयत्नातून तसेच दि कॅान्झर्वेशन फाऊंडेशन अॅाफ इंडिया चे अध्यक्ष मा.आशिष घेवडे व मितेष घेवडे यांचे पुढाकारातून आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.राजाराम महाविद्यालयाच्या डॅा.अंजली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

घोसरवाड, बाबरवाडी आणि दत्तवाड कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन स्कूल बॅग व शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी कमते सर, मुख्याध्यापक, तसेच राजू पलसकर, दत्तवाड यांच्यासह शिक्षक, मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देणाऱ्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शिक्षणासाठी मिळालेले प्रोत्साहन हेच या उपक्रमाचे यश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.


प्राची खेतानी यांचे वतीने व श्री. भवानीसिंह घोरपडे सरकारांच्या सहयोगातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Total Views: 14