बातम्या

*डॉन बास्को सामाजिक संस्था गोवा कडून कानोलीत शिधा किटचे वाटप

Distribution of ration kits in Kanoli by Don Bosco Social Organization


By nisha patil - 7/20/2026 11:43:08 AM
Share This News:



*डॉन बास्को सामाजिक संस्था गोवा कडून कानोलीत शिधा किटचे वाटप
 

*आजरा(हसन तकीलदार)-- डॉन बास्को सामाजिक संस्था गोवा यांचे मार्फत गरीब,विधवा, परितक्त्या आणि अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या कुटुंबाना रोजच्या वापरातील रेशन किटचे वाटप कानोली  ता. आजरा येथे करण्यात आले.
   

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गावच्या सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील होत्या, यावेळी स्वागत व प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले, आणि या सामाजिक उपक्रमाबद्दल डॉन बास्को यांचे गावच्या वतीने आभार मानले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरूस्कर  यांनी उपक्रमाची विस्तृत माहिती दिली.  कानोलीसह  हारूर येथील कुटुंबानाही  या किटचे वाटप करण्यात आले, यावेळी चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, शिवाजी पाटील, तानाजी पाटील हेमंत पाटील,सौरभ भोगण यांच्यासह  ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते..


*डॉन बास्को सामाजिक संस्था गोवा कडून कानोलीत शिधा किटचे वाटप
Total Views: 78