बातम्या

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शालेय साहित्याचे वाटप

Distribution of school supplies in memory


By nisha patil - 8/20/2026 12:53:34 PM
Share This News:



शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शालेय साहित्याचे वाटप

कोल्हापूर दि. 20 :  शिक्षणाचा सर्वांगीण प्रसार झाल्याशिवाय ज्ञानवर्धनाची ऊर्जा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे या उद्देशाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांनी केली . डॉ. बापूजींचे विचार हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य शिक्षक गुरुदेव कार्यकर्ते यांनी वर्ग अध्यापना सोबत निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन करावे व त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यामध्ये समाविष्ट करुन घेतले आहे.

दिनांक 08 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झालेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्याध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आणि श्री कौस्तुभ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर

डॉ मिलिंद हुजरे, प्राचार्य, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर,  प्रा. सौ. शिल्पा भोसले, ज्यूनियर आर्टस कॉमर्स विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने प्रा जितेंद्र भरमगोंडा यांनी चिंचवाड हायस्कूल, चिंचवाड येथील गरीब होतकरू  गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप केले .सदरच्या कार्यक्रमास हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आडमुठे सर

श्री पासान्ना सर यांचे सहकार्य लाभले.


शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शालेय साहित्याचे वाटप
Total Views: 8