बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन जयंती साजरी
By nisha patil - 12/8/2026 3:22:13 PM
Share This News:
डिजीटल युगात डॉ. रंगनाथन यांचे विचार मोलाचे – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन जयंती साजरी
कोल्हापूर दि.12 : ई पुस्तके, डिजीटल ग्रंथालये, ऑनलाईन डेटाबेस, कृत्रिम बुध्दीमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डॉ. रंगनाथन यांचे विचार अत्यंत मोलाचे आहेत. ग्रंथालये साचेबद्ध शास्त्रीय चाकोरीत डॉ. रंगनाथन यांच्यामुळे आली . नेहमी वाचत रहा, समृद्ध जीवन जगण्याचा वाचन हा राजमार्ग आहे. विद्यार्थ्यांची पावलं नेहमी ग्रंथालयाकडे वळावीत, हीच पावले तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवतील. असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले.
ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या हस्ते झाले.
दुपारच्या सत्रात स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथालयांचा प्रभावी वापर या विषयावर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन म्हणून युनिक ॲकेडेमी, पुणे चे सदस्य श्री. कैलास भालेकर यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाईन व्याख्यानासाठी युनिक ॲकेडेमी, पुणे चे चंद्रकांत खरात, करिअर कौन्सिलींग सेलच्या प्रमुख डॉ. राजश्री पाटील, ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मृणालिनी देसाई आणि डॉ. केतकी पाटील यांनी केले.
या व्याख्यानासाठी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शनाचे संयोजन श्री.बी.ए.नारे,
सौ. प्रियांका बिडकर, श्री बी एस खोत, मंगल गुरव, प्रतिक पानारी, श्री सुरेश इंगळे यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन जयंती साजरी
|