बातम्या
शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना आज कोल्हापूरचा भावपूर्ण निरोप
By nisha patil - 4/8/2026 9:23:03 PM
Share This News:
शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना आज कोल्हापूरचा भावपूर्ण निरोप
कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना उद्या (बुधवारी) अखेरचा निरोप दिला जाणार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला सायंकाळी ४ वाजता प्रारंभ होणार असून, सायंकाळी ५ वाजता कसबा बावडा येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर राज्यभरातून राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, अंत्ययात्रेतही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
शिक्षण, आरोग्य, सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कार्याची आठवण कायम प्रेरणादायी राहील
शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना आज कोल्हापूरचा भावपूर्ण निरोप
|