बातम्या

कागलमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना अकरा कोटी शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप

Educational scholarships worth eleven


By nisha patil - 8/31/2026 1:36:13 PM
Share This News:



गोरगरिबांचे वाली हसन मुश्रीफ यांचे फोटो घराघरात लावा             

माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे भावनिक आवाहन
             
कागलमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना अकरा कोटी शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप

           
कागल, गरीबांचा खरा वाली कोण असेल, तर ते नामदार हसन मुश्रीफ आहेत. जोपर्यंत मंत्री श्री. मुश्रीफ गोरगरिबांच्या पाठीशी उभे आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे आहोत. गरीब, उपेक्षित आणि दलितांवर प्रेम करण्याची किमया आणि क्षमता मुश्रीफांसारखी महाराष्ट्रातच कोणाकडे नाही. ​त्यांच्या या माणुसकीच्या कामाबद्दल त्यांचे घराघरात फोटो लावा, असे आवाहन माजी आमदार संजयबाबा  घाटगे यांनी केले.
         

कागलमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना अकरा कोटी रुपये शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. माजी आमदार श्री. घाटगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
         
भाषणात श्री. घाटगे पुढे म्हणाले, माझी स्वतःची बहीण दिव्यांग होती. तिला उभे राहता येत नव्हते, जेवताही येत नव्हते. तिला लहानाचे मोठे आणि पूर्णतः पालनपोषण माझ्या आईनेच केले. अशा मुलांसाठी काहीतरी करावे म्हणून मी खूप वर्षे प्रयत्न केला. नामदार मुश्रीफ यांनी हे काम खऱ्या अर्थाने पूर्ण केले. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते, हे आम्हाला कोणी स्वप्नात जरी सांगितले असते तरी खरे वाटले नसते. त्यांनी सुरू केलेल्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी आज १४ हजार कोटी रुपये शिल्लक आहेत.
          
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, बांधकाम कामगारांचा हा १९९६ सालचा केंद्र सरकारचा कायदा होता. परंतु; राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती. २००५ साली मी कामगार कल्याण मंत्री झाल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत बांधकाम बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपोटी ७५ कोटी रुपये अदा झाले आहेत. लवकरच  १०० कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण होईल.  नोंदणीत बांधकाम कामगारांनी दरवर्षी नूतनीकरण केले पाहिजे. त्याशिवाय त्यांना या विविध योजनांचे लाभ मिळणार नाहीत. बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांची पुस्तिका काढून ती घराघरापर्यंत पोहोचवू.
         
जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफांना मंत्रिमंडळात जी खाती मिळाली त्या खात्याला न्याय देण्याचे काम केले . गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले . आरोग्याच्या बाबतीत त्यांनी चांगले काम केले आहे. लाखो रुग्णांना याचा फायदा झाला आहे . कामगार मंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळे बांधकाम कामगारांचे तर कोटकल्याणच केले आहे . यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मनोगत व्यक्त केले .       
       
म्हणूनच पेन्शनचा कायदा तयार केला......!
श्री. मुश्रीफ म्हणाले, दिव्यांग रुग्णांच्या व्यथा सांगताना माजी आमदार संजयबाबा घाटगे यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या बहीणही दिव्यांग होत्या. ज्यांची परिस्थिती चांगली आहे, अशा रुग्णांची त्यांचे आई-वडील काळजी घेऊ शकतात. परंतु; ज्यांची परिस्थिती गरिबीची, हलाखीची आहे अशा रुग्णांची आणि त्यांच्या आई-वडिलांची फारच फरफट होते. त्या भावनेतूनच दिव्यांग रुग्णांच्या पेन्शनचा हा कायदा मी तयार झाला.
         
कागलच्या नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप उर्फ भैया माने, कागल पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयवंतरावण, संजय गांधी योजना निराधार समितीचे माजी अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, पंचायत समितीचे उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर , भैरू पाटील, फारूक मुल्ला, सुरेखा गोणुगडे, प्रियांका घाटगे, किरण पाटील, संजय चितारी, कागल तालुका बांधकाम कामगार योजना समितीचे अध्यक्ष अशोक वडर, सहअध्यक्ष संतोष गायकवाड यांच्यासह बांधकाम कामगार लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
        
स्वागत सहाय्यक कामगार आयुक्त संदेश अहिरे यांनी केले . प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केले . 


कागलमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना अकरा कोटी शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप
Total Views: 14